नागपूर शहर: पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून २५ क्यूसेक्स पाणी नदीत पात्रात ;उन्हाळा लक्षात घेता आकस्मिक पाणी मागणी
भंडारा तसेच नागपूर जिल्ह्यातील सुर नदी लगत असलेल्या नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी उन्हाळा लक्षात घेता आकस्मिक पाणी मागणी केली होती. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी ४ वाजता २५ क्यूसेक्स पाणी नदीत पात्रात सोडण्यात आले आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता पेंच पाटबंधारे विभाग कार्यालयाने दिली आहे.