कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत वरवटे पाले ते संभे स्टॉपदरम्यान असलेल्या छोट्या पुलावर स्कूटर आणि मोटरसायकलचा समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले.ही घटना शनिवारी दुपारी घडली. अपघातात ठार झालेल्यांमध्ये दिनेश भिकू पवार (वय 34, रा. विठ्ठलनगर, रातवड, ता. माणगाव). जाबीर इब्राहिम शाह (वय 28, रा. धाटाव, ता. रोहा, मुळगाव – कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.