नागपूर शहर: रोहना येथे दोन दुचाकीची धडक, दोन युवकांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
20 एप्रिल रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल कुंभरे वय 18 वर्ष हा त्याच्या दुचाकी ने तसेच सरगम साखरे वय 25 वर्ष हा त्याच्या दुचाकीने पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील रोहना येथून जात असताना दोन्ही दुचाकीची धडक झाली. या अपघातात प्रफुल चा व सरगम चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन खापरखेडा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.