नागपूर शहर: मित्रांची मज्जा-मस्ती दुःखात बदलली; पोहताना नागपुरातील युवकाचा बुडून मृत्यू
मानेवाडा रोडवरील सावित्रीबाई फुले नगरातील रहिवासी सुरज बाबाराव परीपगार (वय ३०) हा आपला मित्र प्रतीक अरुण सोनुने आणि इतर दोन मित्रांसह रामटेक येथे फिरण्यासाठी गेला होता. फिरल्यानंतर बुधवारी सकाळी सर्व मित्र मोहगाव झिल्पी येथे पोहोचले. तिथे निसर्गरम्य वातावरणात ते व्हिडिओ आणि रील बनवण्यात मग्न होते. याच दरम्यान, प्रतीक पोहण्यासाठी पाण्यात उतरला.