यावल: यावल तालुक्यातील बोरावल टाकरखेडा जवळील शेळगाव बॅरेज मध्ये तरुणाचा मुक्तदेह आढळला, यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Yawal, Jalgaon | Sep 27, 2025 यावल तालुक्यातील बोरावल टाकरखेडा गावाजवळ शेळगाव बरेज आहे. येथे भुसावळ येथून तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या अक्षय चौधरी वय २१ या तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आला त्याचा मृतदेह तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आला येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.