मिरज: मल्लेवाडी साई पेट्रोल पंपाच्या शेजारी आढळला कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह
Miraj, Sangli | Aug 26, 2025 मिरज–सलगरे महामार्गावरील मल्लेवाडी येथे साई पेट्रोल पंपाच्या शेजारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महामार्गालगत असलेल्या काटेरी झुडपामध्ये हा मृतदेह दिसून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ही घटना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावर पोलीस उपाधीक्षक प्रणील गिलडा, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित सिद, मल्लेवाडीचे पोलीस पाटील अभय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आणि