हिंगणघाट: तुकडोजी चौकातील उडानपुला खाली पोलिसांनी दोन संशयित परप्रांतीयांना केली अटक:दोन चाकू व एक पेचकस जप्त
हिंगणघाट शहरातील तुकडोजी चौकातील उडानपुलाखाली संशयितरीत्या स्वताचे अस्तित्वात लपवून आढळून आलेल्या दोन परप्रांतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ कपडे दोन धारधार चाकू, लोखंडी टामी, पेचकस आढळून आले त्यांना नाव विचारले असता एकाने राजु उर्फ कुलवंतसिग,बलवंतसिग वय ४८ राहणार फत्तेपूर उत्तराखंड तर दुसऱ्याने त्रिलोकसिंग उर्फ कपिल तिरथसिंग वय ३५ राहणार लतिफपुर उत्तर प्रदेश असे सांगितले आहे.