बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पटना येथील एका कार्यक्रमात नियुक्ती पत्रदेताना आयुष डॉक्टर असलेल्या मुस्लीम महिलेचा बुरखा हिजाब ओढून तिचा आणि समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एका मुख्यमंत्र्यांना असं करणं शोभत नाही, त्यांचे वर्तन अशोभणीय असल्याने महामहीम राष्ट्रपती यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे आज बुधवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता केली.