मानगाव: अपुऱ्या केरोसीनने तोंडाला पुसली पाने
Mangaon, Raigad | May 28, 2026 युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईने होरपळलेल्या माणगाव तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तब्बल तीन महिन्यांनंतर केरोसीन पाठवले खरे, मात्र ते इतके तुटपुंजे आहे की त्यामुळे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले आहे. तालुक्याला आवश्यक असलेल्या तुलनेत केवळ 9,000 लिटर केरोसीन प्राप्त झाले असून, 38,606 रेशन कार्डधारक आहेत. या शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबांची तहान भागवणे वितरकांसाठी एक न सुटणारे कोडेच बनले आहे.