जालना: महिलेला अश्लिलपणे ट्रोल केल्याने जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा; ललिता तारख यांच्या तक्रारीनंतर कारवाई
Jalna, Jalna | Oct 2, 2026 मराठा आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारख यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे पाटील यांच्या 10 ते 11 समर्थकांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अश्लील मजकूर, बदनामीकारक फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे, तसेच धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ललिता तारख यांनी गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.