रावेर: अटवाडे या गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 16, 2025 रावेर तालुक्यात अटवाडे हे गाव आहे. या गावात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. दरम्यान या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही. तेव्हा रावेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.