नागपूर शहर: मानकापूर परिसरात भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू : अमोल कांबळे पोलीस उपनिरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे यांनी 15 एप्रिलला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष इंगोले हे आपल्या दुचाकीने अवस्थी नगर येथील हल्दीराम शोरूमसमोरून जात होते. यावेळी एका भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा चॅम्पियन अल्फा क्रमांक: MH 31 DS 0559 या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संतोष गंभीररीत्या जखमी झाले.जखमी संतोष यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.