अकोट नगरपालिका निवडणूक निकाल हे उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे दरम्यान निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमी वरती शहर पोलीस सतर्क आहेत. शहर पोलिसांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवरती शहरात कायदा सुव्यवस्था सतर्क असल्याचे पतसंचलन करत दाखवून दिले. शहरांत ठीक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून निवडणूक निकालातील जय पराजयाच्या निकालावरून कुठेही शांतता भंग होणार नाही यासाठी पोलीस सतर्क असल्याचे या पथसंचालनात दिसून आले.