लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या तसेच बीओटी तत्वावरील व्यापारी संकुलांतील गाळेधारकांसाठी थकित भाडेवसुलीसाठी एकदिवसीय विशेष वसूली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशान्वये दि. ८ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत थकबाकीवरील १०० टक्के व्याजमाफी लागू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी गांधी मैदान येथील व्यापारी संकुल (सा. क्र. १११ व ११२) तसेच फ्रुट मार्केट व्यापारी संकुलात विशेष शिबिर होणार आहे.