बोदवड: उचंदा शेत शिवारातून शेत गट क्रमांक ११४ मधून ४० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरी, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 21, 2025 उचंदा शेत शिवारामध्ये गणेश माणिकराव पाटील यांचे शेत गट क्रमांक ११४ आहे. यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल मोटर ला ८०० मीटर लांबीची केबल लावली होती त्याची किंमत ४० हजार रुपये होती. तेव्हा ही केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे