नागपूर शहर: कळमना हद्दीत घरात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट
नागपूर येथील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी माता नगर परिसरात एका ४३ वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. पुरुषोत्तम उर्फ बबलू गोविंदसिंह साहू असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो एकटाच राहत होता आणि गणेशपेठ बस स्थानक परिसरात पॉवरबँक व हेडफोन विकून आपला उदरनिर्वाह करत होता