अलिबाग: पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचा ऑफिसला सायकलने प्रवास
Alibag, Raigad | May 15, 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाची अंमलबजावणी केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता, रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ती प्रत्यक्ष कृतीत आणली आहे. आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी त्यांनी आता 'सायकल'चा वापर सुरू केला असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशातील वाढता इंधनाचा वापर आणि पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधानांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते.