समुद्रपूर: गिरड येथे पार पडली भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक: जिल्हा सचिव संजय डेहणे यांनी केले मार्गदर्शन
समुद्रपूर आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येथील गुरुमाऊली सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या गिरड सर्कलच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीचे आयोजन आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होती .या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा सचिव संजय डेहणे, तालुका अध्यक्ष हेमंत राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ महेश गौर, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे, सरपंच राजु नौकरकर,विलास नवघरे, बहादूरसिंग अकाली उपस्थित होते.