समुद्रपूर: गिरड पोलिस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी: रन वॉक फॉर युनिटची रॅलीची सुरुवात
गिरड पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० व्या जयंती निमित्ताने वॉक फॉर युनिटीची सुरुवात ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.यावेळी गावातील मान्यवर,पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थित गिरड बस स्टॉप चौकातून मुख्य मार्गाने वॉक फॉर युनिटीची रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य मार्गाने निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.