नागपूर शहर: अथर्व नानोरे हत्याकांड: नागपूरच्या वकिलांचा मोठा निर्णय; आरोपींची वकिली न करण्याचा जिल्हा बार असोसिएशनचा ठराव
शहरातील बहुचर्चित आणि हृदयद्रावक अशा अथर्व नानोरे हत्याकांडाने संपूर्ण नागपूर हादरून गेले आहे. या क्रूर कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी नागपूरचा वकील समुदाय आता एकवटला आहे. डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अथर्व नानोरे अपहरण करून खंडणीसाठी त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.