नागपूर शहर: नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघड; गुन्हे शाखेची कारवाई
24 जूनला दुपारी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील यशोधरानगर भागात घरफोडी करून ६८,००० रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे.गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाद्वारे अर्शद खान आणि शेख आरीफ या दोन आरोपींना ताब्यात घेतले.आरोपींकडून चोरीतील दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.