दिग्रस नगर परिषदेच्या मागील भागात नाल्या घाणीने तुडुंब भरल्या असून गेल्या एक ते दीड महिन्यापासून सफाई कर्मचारी येथे आले नसल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचे दुर्लक्ष नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, येथील नागरिक अमीन पठाण यांनी या स्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून तो आज दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.