खालापूर: खालापूर तालुक्यात आदिवासींचा रस्त्यासाठी एल्गार
खालापूर तालुक्यातील माडप मुठा ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांनी रस्त्यासाठी एल्गार केला असून, रस्ता न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देत कुटुंबासह ठिय्या आंदोलन केल्यान येथील वातावरण काहीकाळ तंग बनले होते. 600 हुन अधिक आदिवासी बांधवांची वस्ती असणाऱ्या माडप मुठा ठाकूरवाडी च्या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून 9 कोटी निधी मंजूर करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वाजत गाजत आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती.