लातूर: लातूर जिल्ह्यात वन्य प्राण्याचा जोरदार हल्ला: देवणीत 6 जखमी,दोघांची प्रकृती चिंताजनक;लांडगा की पिसाळलेला कुत्रा संभ्रम
Latur, Latur | Oct 31, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यातील देवणी येथील पंचायत समिती परिसरात आज सकाळपासून बिथरलेल्या वन्य प्राण्याने सलग हल्ले चढवत सहा नागरिकांना जखमी केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना पुढील उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन्य प्राण्याने हल्ला केला.