नागपूर शहर: व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या चौघां तोतया पत्रकारांना अटक: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 24 जूनला दुपारी 3:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपुरातील 'त्रि-शक्ती ट्रेडिंग कंपनी'मध्ये घुसून स्वतःला 'क्राइम ब्रांच'चे अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या चौघांनी मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. गौरव पांडे, सचिन बैस, नरेंद्र चौबे आणि जितेंद्र कुंदवानी अशी आरोपींची नावे आहेत.यातील दोघांकडे पत्रकारितेची ओळखपत्रेही आढळली आहेत. आरोपींनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची आणि दुकानावर धाड टाकण्याची धमकी दिली होती. याबद्दलच