घनसावंगी: महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा पुढाकार; लोकसहभागातून ६ किमी वीजवाहिनीवरील झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत..
महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा पुढाकार; लोकसहभागातून ६ किमी वीजवाहिनीवरील झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत.. मान्सूनपूर्व देखभालीवर प्रश्नचिन्ह; कामे न करताच बिले उचलल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप.. आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वडीगोद्री येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बारसवाडा कृषी वीजवाहिनीवरील झाडांच्या अडथळ्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत लोकसहभागातून वडीगोद्री ते बारसवा