यावल: यावल येथील मटन मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून एकाला दोघांची मारहाण, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Oct 20, 2025 यावल शहरातील सुंदर नगरी भागातील रहिवाशी महेंद्र विठ्ठल वारी वय ३७ हा तरुण मटन मार्केट जवळील अकबर भंगारवाला यांच्या दुकानाजवळ गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याला दोन अज्ञात अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोक्यात मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.