करवीर: अखेर मुहूर्त ठरला... कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच काम रंगकर्मी दिनापूर्वी पूर्ण होणार
कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे संवर्धनाचं काम येणाऱ्या 27 मार्च 2026 या रंगकर्मी दिनाच्या पूर्वी पूर्ण केल जाणार आहे. कोल्हापुरात आज महापालिका अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि रंगकर्मी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा रंगकर्मी दिनाच्या दिवशी पहिला प्रयोग संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेलाय. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाचे संवर्धनाचे काम ठेकेदारामुळे रखडले गेल्याचा आरोप रंगकर्मींनी केला होता.