नागपूर शहर: धक्कादायक! वेंकटेशनगरमध्ये माय-लेकीचा गळफास, सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल : श्रीराम काळे सहायक पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे यांनी 4 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत वेंकटेशनगरमध्ये माय-लेकीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपीमध्ये लोकेश ब्रम्हे, सासरा सुधाकर, सासू अनुसया, नणंद प्राची आणि नणंदोई अमोल डफ यांचा समावेश आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे यांनी दिली आहे.