बसमत: अखिल भारतीय वीरशेव शिवाचार्य संस्थेचे हिंगोली नांदेड जिल्हा विभागीय बैठक गिरगाव येथे संपन्न
गिरगाव विरमठ संस्थान येथे 15/09 च्या सकाळी11 च्या सुमारास अखिल भारतीय विरशेव संस्थेचे उपाध्यक्ष निलकंठ शिवाचार्य महाराज नागलसुरकर यांच्या मार्गदर्शनाखालि अखिल भारतीय वीरशेव शिवाचार्य संस्थेचे हिंगोली नांदेड जिल्हा विभागीय बैठक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यामध्ये श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव यांची अध्यक्ष तर डाँ .सिददयाळ शिवाचार्य महाराज उपाध्यक्ष तर दिगंबर शिवाचार्य महाराज यांची सचिव तथा शिवचैतंन्य शिवाचार्य महाराज यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली