मिरज: सांगली मनपा क्षेत्रातील नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात ;२० जूनपर्यंत सर्व नाले स्वच्छ करण्यात येणार : आयुक्त सत्यम गांधी
Miraj, Sangli | Jun 3, 2025 महापालिका क्षेत्रातील नालेसफाई अंतिम टप्प्यात आली आहे. ७९ पैकी ६३ नाल्यांची स्वच्छता झाली आहे. उर्वरीत १६ पैकी १० नाल्याची सफाई सुरू आहे. नालेसफाईतून आतापर्यंत ७० टन कचरा काढण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, नालेसफाईचे काम प्रभावीपणे होण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी आदेश दिले आहेत. नालेसफाईच्या कामावर ते लक्ष ठेवून आहेत. पावसाळा पूर्व नालेसफाई प्रभावीपणे व्हावी, यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती