मालवण: सिंधुदुर्गमध्ये जलसंधारण कामांचे डिजिटल विश्लेषण, 'sindhudurg.ai' ची नवी प्रणाली लवकरच वापरात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांवर होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करण्यासाठी 'sindhudurg.ai' ही AI आधारित डिजिटल प्रणाली तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रणालीचा उपयोग जलसंधारण कामांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी केला जाणार आहे.