दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.४५ ते १०.०५ दरम्यान लातूर जिल्ह्यातील मुरूड ,करकट्टा येथे मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याची माहिती प्राप्त झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तत्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) कडे तपासणीसाठी पाठपुरावा केला. NCS कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही.