जालना: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुनराव खोतकर यांचे साधेपणाने गणरायाचे आगमन
Jalna, Jalna | Sep 14, 2026 जालना शहरासह देशभरात आज मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होत असताना, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या निवासस्थानी गणरायाचे स्वागत केले. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन करणाऱ्या खोतकर यांनी यंदा दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणाला प्राधान्य दिले. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून “यंदा चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा सुखी राहू दे”, अशी मनोभावे प