मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशनच्या पथकाने पाचगाव शेतशिवारातील कॅनल रोडवर सापळा रचून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठी कारवाई केली. ११ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना, सूर नदीच्या पात्रातून एका ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचगाव शिवारात नाकेबंदी केली, संशयास्पद ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता त्यात अवैध रेती मिळून आली. चालक प्रवीण रमेश पटले..