लातूर: वकील मंडळाचा निषेध मार्च,न्यायाधीशांवर बूटफेक प्रयत्नाचा तीव्र विरोध जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता मोर्चा
Latur, Latur | Oct 8, 2025 लातूर -सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा लातूर वकील मंडळाने आज तीव्र निषेध व्यक्त केला. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांतता मार्च काढण्यात आला.वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणीवकील मंडळाच्या वतीने संबंधित वकिलाची वकिलीची सनद कायमस्वरूपी रद्द करण्याची ठाम मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.