वाशिम: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले चढले जिल्हा परिषदेच्या आवारातील टॉवरवर
Washim, Washim | Oct 10, 2025 तीन तालुके विशेष पॅकेज मधून वगळले, स्वाभिमानी आक्रमक, युवक प्रदेशाध्यक्ष चढले टॉवरवर. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेज मधून वाशिम जिल्ह्यातील तीन तालुके वगळण्यात आले त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी वाशिम जिल्हा परिषदेच्या आवारातील टॉवरवर चढून आंदोलन केलंय. तीनही तालुक्याचा पॅकेज मध्ये समावेश होत नाही तोवर खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तब्बल दिड तास हे आंदोलन सुरु होत