जालना: जालना शहरात दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद; गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व कोयता जप्त
Jalna, Jalna | Sep 26, 2026 गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचा संशय असलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, धारदार कोयता आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 26 सप्टेंबर रोजी पहाटे एकता मोटर्सजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावरील पथकाने कारवाई केली.