भोकरदन: गायनधारकांनी केले भोकरदन तहसील कार्यालयासमोर पीकपेरा आणि सातबारा साठी एकदिवसीय धरणे आंदोलन
आज दि.21 जुलै 2025 सोमवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर भोकरदन ता. व परिसरातील शेकडो गायरान धारकांनी एकदिवशीय धरणे आंदोलन करत मागणी केली आहे, की मागील 30 ते 40 वर्षापासून शेकडो गायरान धारक हे गायरान जमीन काढून आपला उदरनिर्वाह करत आहे ,मात्र शासनाकडून यांच्या संदर्भात कुठलाही लेखी आदेश व त्यांचा पिकपेरा व सातबारा काढण्यात आलेला नाही,त्यामुळे सदर ताबा असलेल्या गायरान जमिनीचा पीक पेरा व सातबारा मिळवण्यासाठी एक दिवसीय आंदोलन केले आहे.