पनवेल: कर्नाळा पक्षी अभयारण्यात दुर्मीळ पक्ष्यांचे अस्तित्व
Panvel, Raigad | May 4, 2026 बुद्ध पौर्णिमा निमित्त कर्नाळा बर्ड सँक्च्युरी येथे वन विभागाच्या वतीने प्राणी गणना मोहिम उत्साहात पार पडली. मुंबईगोवा महामार्गालगत असलेल्या या अभयारण्यात पहाटेपासूनच विविध ठिकाणी मचान उभारून आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने प्राण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेत वन अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक सर्पमित्रांचा सक्रिय सहभाग होता. जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते.