नागपूर शहर: धंतोलीतील एकाच कुटुंबातील ५ सदस्य बेपत्ता; आर्थिक विवंचनेतून घर सोडण्याचा संशय : साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 6 जुलैला दुपारी 4 वाजता झालेल्या माहितीनुसार,नागपूरच्या धंतोली भागातील 'दुर्गा सदन' येथून सुरेश परसवाणी यांच्या कुटुंबातील ५ सदस्य २४ जूनपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. यामध्ये हर्षा, जितेंद्र, इशिता, खुशी आणि कृष्णा परसवाणी यांचा समावेश आहे. परिजनांनी दिलेल्या तक्रारीनंतर धंतोली पोलीस तपास करत असून, प्राथमिक अंदाजानुसार कर्जाच्या विवंचनेतून हे कुटुंब घर सोडून गेल्याचा संशय आहे.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोल