नागपूर शहर: इन्स्टाग्राम वर कॉल करून बोलविले अन् केले सपासप वार,धक्कादायक माहिती आली समोर प्रवीण काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस प्रवीण काळे यांनी 6 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबद्दलची अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.