नागपूर शहर: मोमीनपुऱ्यातील जामा मस्जिदमध्ये ईद-उल-अजहा निमित्त विशेष नमाज; मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त आज नागपुरातील मोमीनपुरा येथील ऐतिहासिक जामा मस्जिद येथे विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सणाचे औचित्य साधत शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिदमध्ये एकत्र येत अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने नमाज अदा केली.