तळा: तळा तालुक्यातील चविष्ट सोड्यांना खवय्यांची पसंती
Tala, Raigad | Apr 22, 2026 तळा तालुक्यातील मांदाड काठालगत रहाटाड, वाशीह वेली, मांदाड, मजगांव, कुडे, गिरणे, रोवळा इत्यादी गावे आहेत. या खाडीकाठच्या रहाटाड या गावचे सोडे प्रसिद्ध आहेत. कोणीही विश्वासाने खरेदी करावे असे असतात. त्या सोड्यांमध्ये कोणतीही फसवणूक होत नाही. त्यामुळे या सोड्यांना मुंबई, पुणे ते रायगड जिल्ह्यातील सर्व भागांतून खवय्यांची पसंती आहे. दरवर्षी मागणीत वाढ होत आहे. मात्र रहाटाड गावच्या 25 ते 30 इंजिनवरील होड्या होत्या, त्या आता दोन, तीन राहिल्याने मच्छीमारीत घट झाली आहे.