नागपूर ग्रामीण: पोलिसांची धडक कारवाई: १ लाख १७ हजारांचा प्रतिबंधित तंबाखूसाठा जप्त, एकावर गुन्हा दाखल
नियमित गस्तीदरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुप्ता पान शॉपवर पंचांसमक्ष धाड टाकली. या कारवाईत आरोपी नितेश नथुलाल गुप्ता हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुकान उघडून शासनाकडून प्रतिबंधित केलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जसे की विमल बिग, रजनीगंधा, बाबा ब्लॅक, राजश्री पान, सिग्नेचर, मिराज, पान पराग प्रिमियम आणि विमल विक्रीसाठी बाळगताना रंगेहाथ मिळून आला.