नागपूर शहर: नागपूरच्या भाविकांच्या कारला भीषण अपघात;चिमुकल्यासह ३ ठार, ५ गंभीर
पंढरपूर आणि अक्कलकोट येथे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या भाविकांच्या तवेरा कारला वर्धा जवळील सावंगी बायपासवर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला आणि एका ६ वर्षांच्या बालकासह ३ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी*झाले आहेत.