हवेली: लोणी काळभोर येथे नाविन्यपूर्ण सरपंच आपल्या दारी उपक्रमाला झाली सुरुवात
Haveli, Pune | Sep 16, 2025 सरपंच आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात लोणी काळभोर येथील दुंडे वस्ती, मोगले वस्ती, दुगाने वस्ती, सुपेकर मळा येथे झाली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मनमोकळ्यापणाने मांडल्या त्याप्रसंगी त्यांच्या समस्या जाणून घेताना श्री.प्रशांतदादा काळभोर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पूणे), सरपंच श्री. राहुल भाऊ काळभोर, ग्रा.प.सदस्य श्री.राजाराम बापू काळभोर, संजय गायकवाड (मा.जी.प.सदस्य), हेमंत गायकवाड (अध्यक्ष अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट), बाळासाहेब काळभोर (मा.ग्रा.प.सदस्य) उपस्थित होते.