लातूर: सेवाकार्याच्या माध्यमातून सशक्त व निरोगी समाजनिर्मिती व्हावी-पालकमंत्रीभोसले
पंतप्रधानच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोषित व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवा परमो धर्म या तत्वाचा अवलंब करत केंद्र सरकारच्या माध्यमातून कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा सुद्धा सेवा परमो धर्म हीच असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पंधरवाड्यात सेवा कार्याच्या माध्यमातून सशक्त व निरोगी समाजनिर्मिती व्हावी अशी अपेक्षा पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.