जैन मुनीवर श्रीप्रशमरती विजयजी यांनी भद्रावती येथील सुप्रसिद्ध जैन मंदिरास भेट दिली.यादरम्यान त्यांनी खासदार प्रतीभा धानोरकर यांचेशी जैन मंदिर भवनात संवाद साधुन बंगाली कैंप येथील उत्खननात सापडलेल्या जैन धर्मीय पुरातन अवशेषाचे जतन व रक्षण करण्याची मागणी केली.यावर खा.धानोरकर यांनी तसे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जैन श्वेतांबर मंडळाचे अमोल मुथा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते.