सातारा म्हणजे ऐतिहासिक भूमी छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज व राजे शाहू महाराजांच्या गादी चा शौर्य पराक्रम अनुभवलेली भूमी त्यात मातीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यात निमंत्रित कवी म्हणून विदर्भातील सु विख्यात वऱ्हाडी गझलकार, कवी,शेतकरी साहित्य रचनाकार,यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे कवी विजय ढाले यांना रचना सादर करण्याचा सन्मान मिळाला सलग ३ वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे भाग्य विजय ढाले यांना लाभले असे ते जिल्ह्यातील एकमेव कवी ठरले